भोपाळ : मध्य प्रदेशात कार्यरत असलेल्या एका सहायक अभियंत्याचा (Sub Engineer) सुट्टीचा अर्ज (Leave Application) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. राजकुमार यादव (Rajkumar Yadav) असं अभियंत्याचं नाव आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मालवा (Malwa) प्रांतातील सुसनेर पंचायतमध्ये राजकुमार कार्यरत आहे. राजकुमारनं अजब-गजब पद्धतीनं सुट्टीचा अर्ज लिहिल्यानं परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.Also Read - Shivsena Dussehra Melava 2021: आधी म्हणत होते मी पुन्हा येईन, आता म्हणतात मी गेलोच नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

‘आत्मा अमर आहे, याचा मला साक्षात्कार झाला आहे. मला पूर्वजन्मातील सगळं काही आठवतं आहे. मला गीतेचा पाठ करायचा आहे. माझ्यातील अहंकार दूर करायचा आहे. मी घरा-घरात जावून भीक मागणार आहे.’, असं राजकुमारनं वरीष्ठांकडे पाठवलेल्या सुट्टीच्या अर्जात लिहिलं आहे. Also Read - RSS Vijayadashami Programme: प्रत्येकाने भेदभावाची भावना बदलावी, समाज तोडणारी नाही तर जोडणारी भाषा करावी: मोहन भागवत


असदुद्दीन ओवैसी सखा नकुल तर मोहन भागवत शकुनी मामा !

राजकुमारच्या सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मी रविवारी जनसेवेसाठी कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही. कारण पूर्वजन्माचा साक्षात्कार झाला आहे. आत्मा अमर आहे. पूर्वजन्मी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे माझे मित्र ‘नकुल’ तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत हे शकुनी मामा होते. या साठी मला गीतेचा पाठ करायचा आहे. प्रत्येक रविवारी आपल्यातील अहंकार मला दूर घालवायचा आहे. गव्हाचा एक-एक दाणा मी घरोघरी जाऊन भीक मागणार आहे. आता माझ्या आत्माचा प्रश्न आहे. तरी मला आपण आठवड्याच्या प्रत्येक रविवारी सुट्टी देण्याची कृपा करावी, ही विनंती.’, असं राजकुमार यादव यानं आपल्या अर्जात लिहिलं आहे. Also Read - PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा रद्द होईल घर!