Top Recommended Stories

Success story viral: गूगलने तरुणाला 39 वेळा केले रिजेक्ट, पण तो हरला नाही! वाचा दृढ निश्चय करणाऱ्या तरुणाची कहाणी

Success story viral: या तरुणाचा दृढ निश्चय म्हणाल किंवा वेडेपणा... 39 वेळा गुगलवर अर्ज केला पण प्रत्येक वेळी त्याला नकार मिळाला. पण अखेर 40 व्या वेळी त्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Published: July 28, 2022 4:04 PM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

गूगलने तरुणाला 39 वेळा रिजेक्ट केले, पण तो हरला नाही! वाचा दृढ निश्चय करणाऱ्या तरुणाची कहाणी
गूगलने तरुणाला 39 वेळा रिजेक्ट केले, पण तो हरला नाही! वाचा दृढ निश्चय करणाऱ्या तरुणाची कहाणी

Success story viral: एका व्यक्तीने गुगलवर (Google) 39 वेळा अर्ज केला पण प्रत्येक वेळी त्याला तिथून नकार मिळाला. पण त्या व्यक्तीचा निश्चय एवढा दांडगा होता की, त्याने 40व्यांदाही अर्ज केला आणि यावेळीही त्याने त्याचे लक्ष्य गाठले. गुगलने त्यांना असोसिएट मॅनेजरची नोकरी दिली. टायलर कोहेन (Tyler Cohen)नावाच्या या व्यक्तीने लिंक्डइनवर (linkedin)ही कहाणी पोस्ट केली आहे जी आता व्हायरल झाली आहे आणि लोक त्यातून प्रेरणा घेत आहेत.

वेडेपणा आणि दृढ विश्वास यांच्यातील एक बारीक रेषा

टायलर कोहेनने लिहिले, वेडेपणा आणि दृढ विश्वास यांच्यामध्ये एक बारीक रेषा आहे, मी अजूनही विचार करत आहे की माझ्यामध्ये कोणती रेषा आहे. 39 नकार आणि एक स्वीकृती, Google ने माझी ऑफर स्वीकारली. टायलर कोहेन हा सॅन फ्रान्सिस्को, यूएसए मधील आहे आणि आता तो DoorDash वर असोसिएट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. या पोस्टसह, कोहनेने 2019 पासून गुगलला पाठवलेल्या त्यांच्या अर्जाचा स्क्रीन शॉट देखील शेअर केला आहे. 25 ऑगस्ट 2019 रोजी, कोहेनने प्रथमच त्याचा अर्ज Google कडे पाठवला. त्यानंतर तो गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करत राहिला.

You may like to read

महिन्यातून दोनदा अर्ज पाठवायचा

कोहेने महिन्यातून दोनदा अ‍ॅप्लिकेशन पाठवत होता. जून 2020 मध्ये कोरोनाच्या पीक काळातही त्याने गुगलला अर्ज पाठवला होता. मात्र, त्यावेळीही तो फेटाळण्यात आला होता. कोहनेची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. कोहेनेने गेल्या आठवड्यात हे पोस्ट केले आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी यावर पोस्ट आणि कमेंट केल्या आहेत.

कोहेनेच्या पोस्टवर गूगलचे भाष्य

कोहेनेच्या पोस्टवर स्वतः गूगलने देखील रिप्लाय दिला आहे. गूगलने लिहिले की, ‘हा प्रवास किती अद्भुत आहे! निश्चितच आता तुझी वेळ आली आहे. यासह गूगलकडून एक लाफ…’ टायलर यांच्या पोस्टवर 40 हजारांहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक कमेंट करून टायलरचे अभिनंदनही करत आहेत. टायलरच्या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या नकाराची कहाणीही सांगितली आहे. एका यूजरने लिहिले – मी 83 वेळा अर्ज केला आहे. 52 नकार मिळाले आणि अजूनही अंतिम फेरीची प्रतीक्षा आहे. दुसर्‍याने लिहिले – मी आतापर्यंत फक्त 5 किंवा 6 वेळा अर्ज केला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.