The Gate of Hell : 'नरकाचे द्वार' मानले जाते जागातील हे मंदिर; जवळ जाताच होतो मृत्यू
जगभरात असे काही ठिकाणे आहेत ज्यांबद्दल विचित्र दावे केले जातात. असंच एक ठिकाण तुर्कीमधील हेरापोलिस (Hierapolis, Turkey) या प्राचीन शहरात आहे. येथे एक प्राचीन मंदिर असून ते नरकाचा दरवाजा असल्याचा दावा केला जातो.

The Gate of Hell : जगभरात असे काही ठिकाणे आहेत ज्यांबद्दल विचित्र दावे (Strange claims) केले जातात. असंच एक ठिकाण तुर्कीमधील हेरापोलिस (Hierapolis, Turkey) या प्राचीन शहरात आहे. येथे एक प्राचीन मंदिर (Ancient temple) असून ते नरकाचा दरवाजा (Door of Hell) असल्याचा दावा केला जातो. या ठिकाणाविषयी असे म्हटले जाते की जो कोणी या मंदिराच्या जवळ जातो त्याचा मृत्यू होतो आणि या मंदिरात कोणी प्रवेश केला तर त्याचा मृतदेह देखील सापडत नाही.
Also Read:
मंदिरात प्रवेश करताच होतो मृत्यू
या ठिकाणाला नरकाचा दरवाजा (The Gate of Hell) म्हटले जाते. कारण गेल्या अनेक वर्षांपासून येथे गूढ मृत्यू (Mysterious death) होत आहेत. सर्वात गूढ गोष्ट म्हणजे मंदिराच्या संपर्कात आल्यास कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होतो. ग्रीक देवाच्या (Greek god) विषारी श्वासामुळे सर्व प्राण्यांचे मृत्यू होतात असा एक समज येथील लोकांमध्ये या मंदिराबद्दल आहे. ग्रीक-रोमन काळात (Greco-Roman period) कोणीही या मंदिरात गेल्यास त्याचा शिरच्छेद केला जाईल असा कायदा करण्यात आला होता.
लोक याला नरकाचे द्वार मानतात
या मंदिराच्या संपर्कात येताच माणसांपासून ते पशू आणि पक्षी देखील मृत्यू पावतात असे म्हटले जाते. येथे सतत होणाऱ्या मृत्यूमुळे लोक या मंदिराच्या दरवाजाला ‘द गेट ऑफ हेल’ म्हणतात. ग्रीक, रोमन काळातही लोक मृत्यूच्या भीतीने येथे जायला भीत होते.
वैज्ञानिकांनी केला रहस्याचा उलगडा
या मंदिरजावळ होणाऱ्या लोकांच्या गूढ मृत्यूंच्या रहस्याचा शास्त्रज्ञांनी उलगडा केला आहे. वैज्ञानिकांच्या मते मंदिराच्या खालून विषारी कार्बन डायऑक्साइड वायू सतत बाहेर पडत आहे. यामुळेच मनुष्य, प्राणी आणि पक्षी त्याच्या संपर्कात येताच त्यांचा मृत्यू होतो.
कीटक आणि पक्षांचाही होतो मृत्यू
शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार मंदिराच्या खाली बांधलेल्या गुहेत मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायू आढळला आहे. सामन्यत: जिथे केवळ 10 टक्के कार्बन डाय ऑक्साईडमुळे एखाद्या माणसाचा 30 मिनिटात मृत्यू होऊ शकतो, तिथे या मंदिराच्या गुहेच्या आत या विषारी वायूचे प्रमाण 91 टक्के आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारे कीटक, प्राणी आणि पक्षी त्याच्या संपर्कात येताच मृत्यू पावतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या