मुंबई : ‘काहीही झालं तरी वाघ गवत घात नाही’ असं म्हटले जातं. मात्र अपचन झाल्यावर किंवा पोट दुखत असल्यास वाघ गवत खातो (Tiger Eating Grass). सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे हे सिद्ध झाले आहे. तुम्हाला वाघ कधीच गवत खात नाही असे वाटत असेल तर हा फोटो पाहून तुम्हाचाही विश्वास बसेल की वाघ देखील गवत खातो.Also Read - Big B Romantic Post: बिग बींनी जया बच्चनसोबतचा रोमँटिंक फोटो केला शेअर, म्हणाले - '49 वर्षांपूर्वी झालं होतं प्रेम'

ट्विटरवर आयएफएस प्रवीण कासवान यांनी हा फोटो शेअर केला आहे. कासवान यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर तो चर्चेत आला आहे. हा फोटो पोस्ट करताना कासवान यांनी त्याला “वाघ कधीही गवत खात नाही !! जेव्हा त्यांना पोटाची समस्या असते तेव्हा वगळता”असे कॅप्शन दिले आहे. (Tiger Eating Grass: Tiger seen eating grass due to indigestion stomach is upset; People said- Nonveg left due to Shravan month) Also Read - 5th Shravan Somwar 2021: शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट!

https://twitter.com/_tejaswini16_/status/1428024200082563073?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1428024200082563073%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fviral%2Ftiger-eating-grass-when-his-stomach-is-upset-viral-photo-trending-on-social-media-people-comment-sawan-ki-wajah-se-vegetarian-ho-gaya-bagh-4898821%2F Also Read - Salman Khan’s Look From Tiger 3 Leaked: सलमान खानच्या 'Tiger 3'चा लूक लीक, सोशल मीडियावर फोटोचा धुमाकूळ!

आयएफएस प्रवीण कासवान यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, “मला वाटतं त्याचा आज उपवास आहे.” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, “सध्या श्रावण सुरू आहे. त्यामुळे वाघ शाकाहार घेत आहे”

आणखी एका यूजरने या पोस्टवर कमेंट करताना लिहिले की “तो वनौषधीचे सेवन करत आहे.” तर एका यूजरने” सर्व प्रकारच्या मांजरी, मोठ्या किंवा लहान, काही वेळा गवत खातात. यामुळे त्यांची पचनसंस्था चांगली राहते” अशी कमेंट केली आहे. तर एका यूजने कमेजशी कमेंट करत लिहिले की, “तुम्ही चुकताय प्रवीण कासवान. वाघ गवत खात आहे कारण सध्या श्रावण महिना सुरू आहे”.