मुंबई : टॉलिवूडचा (tollywood) प्रसिद्ध अभिनेता साई धरम तेजच्या (Actor sai dharam tej) स्पोर्ट्स बाईकला भीषण अपघात (Bike Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये साई धरम तेज गंभीर जखमी झाला आहे. बेशुद्ध अवस्थेत साईला मेडिकओव्हर हॉस्पिटलमध्ये (Medicover Hospital) दाखल करण्यात आले आहे. हैदराबादच्या (Hyderabad) केबल ब्रीजवर हा अपघात झाला. ही घटना ब्रीजवरील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on social media) होत आहे.Also Read - Parineeti Chopra चा ‘जलपरी’ अंदाज व्हायरल, मोनोकनीमधील व्हिडीओला चाहत्यांची पसंती

Also Read - Raqesh And Shamita Dinner Date: राकेश बापटने अखेर वचन केले पूर्ण, शमिता शेट्टीला डिनर डेटवर गेला घेऊन!

साई धरम तेज शुक्रवारी रात्री त्याच्या 18 लाखांच्या स्पोर्ट्स बाईकवरुन जात होता. स्पीडमध्ये असताना अचानक त्याची बाईक घसरली आणि तो रस्त्यावर कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. साई धरम तेजच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. बेशुद्धावस्थेत तात्काळ त्याला मेडिकओव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण पुढील उपचारासाठी त्याला अपोलो हॉस्पिटलमध्ये (Apolo Hospital) हलवण्यात आले आहे. Also Read - Viral Video: कौतुकास्पद! भिंत कोसळताना पाहून आईने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचे असे वाचवले प्राण!

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्याच्यावर व्हेंटिलेटरवर (ventilator) उपचार सुरु आहेत. 48 तास तो डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असणार आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. साई धरम तेजच्या अपघाताची माहिती कळताच अभिनेता पवन कल्याण, अल्लू अरविंद, नागाबाबू, चिरंजीवी (Chiranjeevi) आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेत त्याची भेट घेतली. साई धरम तेज हा चिरंजीवीचा नातेवाईक आहे.