मुंबई : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ लोकांची मने जिंकतात. अनेक व्हिडिओंमधून लोकांचे टॅलेन्ट समोर येत असते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दिसणारा एक पर्यटक मार्गदर्शक म्हणजेच गाइड विदेशी लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल (Guide Introducing Indian culture) माहिती देत आहे. भरतीय संस्कृतीविषयी बोलताना तो त्यांना भरतनाट्यमविषयी अतिशय सविस्तर माहिती (Guide Introducing Bharatanatyam) देत आहे. हा गाइड पर्यटकांना केवळ माहितीच देत नाहीये तर तो त्यांना भरतनाट्यमच्या काही स्टेप्स देखील करून दाखवताना (Tourist Guide Doing Bharatanatyam) दिसत आहे.Also Read - Viral Video : तब्बल 5 किलोमीटरपर्यंत रिक्षाच्या मागे धावला कुत्रा, कारण ऐकल्यावर येईल रडू!

हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये दिसणारा गाइड (Tourist Guide) आणि त्याची पर्यटकांना माहिती देण्याची शैली आणि नृत्य करण्याची शैली पाहून लोक त्याची प्रशंसा करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. या गाइडने अतिशय वेगळ्या शैलीत भरतनाट्यम विषयी पर्यटकांना माहिती दिली आहे. त्याने केलेल्या स्टेप्स आणि हातवारे हे एखाद्या उत्तम भरतनाट्यम करणाऱ्या नृत्यांगणेपेक्षा कमी नाहीये. त्याच्या या शैलीवर (Tourist Guide special style) अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. Also Read - Viral Video : बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा स्टँड कोसळला, 4 जणांचा मृत्यू तर 300 जखमी, धक्कादायक व्हिडिओ होतोय व्हायरल!

Also Read - Wari 2022 : वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडून चोरटा फरार, व्हिडिओ होतोय व्हायरल!

या व्हिडिओत एक गाइड आणि त्याच्या भोवती अनेक विदेशी पर्यटक (foreign tourists) उभे असल्याचे दिसत आहे आणि तो त्यांना भारतीय संस्कृती (Indian culture) आणि भरतनाट्यमविषयी माहिती देत आहे. तो केवळ माहितीच देत नाहीये तर भरतनाट्यम करत अनेक प्रकारचे एक्सप्रेशन देखील देत आहे. त्याची ही शैली पाहून तिथे उपस्थित पर्यटक खुश झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटे ते टाळ्या वाजवून त्याचं कौतूक करताना दिसत आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसंच या व्हिडिओवर कमेन्ट करून यूजर्स या गाइडचा अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ज्याप्रकारे त्याने भारतीय संस्कृतीविषयी विदेशी पर्यटकांना मार्गदर्शन केले आहे, त्यामुळे तो प्रशंसेस पात्र ठरला असल्याच्या प्रतिक्रिया यूजर्सकडून व्यक्त होत आहेत.