ट्रान्सजेंडर सेलिब्रिटीने साडी नेसून मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'Kacha Badam'वर केला भन्नाट डान्स... तुम्ही पाहातच राहाल
Mumbai Local Train: मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये अचानक ट्रान्सजेंडर सेलिब्रिटी पूजा शर्मा (Transgender celebrity Pooja Sharma) हिने अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले बंगाली साँग 'कच्चा बादाम'वर (Kacha Badam) डान्स करायला सुरूवात केली. पूजाने इतका जबरदस्त डान्स केला की लोकलमधील इतर प्रेक्षक पाहातच राहिले.

Mumbai Local Train: गेल्या अनेक महिन्यांपासून बंगाली साँग कच्चा बादाम (Kacha Badam) ट्रेंडमध्ये आहे. इंटरनेटवरील त्याची क्रेझ कमी होण्याची नाव घेत नाही आहे. लोक अजूनही या गाण्यावर थरकताना दिसत आहेत. आत हे साँग इंस्टाग्राम रील्ससाठी सर्वात पॉपुलर गाणे बनले आहे. आम आदमी ते नामांकीत हस्ते या ट्रेंडने ग्लोबल ऑडियन्सला मंत्रमुग्ध करत आहेत. अशातच एका ट्रान्सजेंडर सेलिब्रिटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ट्रान्सजेंडर सेलिब्रिटी पूजा शर्माने (Transgender celebrity Pooja Sharma) कच्चा बादाम.. (Kacha Badam Song) या गाण्यावर थिरकून चाहत्यांचे मन जिकेले आहे.
Also Read:
पूजा शर्मा ही मुंबई लोकलमध्ये रेखा नावाने प्रचलीत आहे. पूजाने साडी नेसून मुंबईत धावत्या लोकल ट्रेममध्ये कच्चा बादाम या गाण्यावर धम्माल डान्स करून इतर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. पूजाचे एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास तिने डान्स करताना कोणाची कॉपी केली नाही. तिने स्वत: ची हटके स्टाईल डेव्हलप केली आहे.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये पूजा शर्माचा डान्स शूट करण्यात आला आहे. पूजाने नारंगी रेशम जरीची साडी नेसली आहे. तिने मॅचिंग ज्वेलरी देखील कॅरी केली आहे. प्रतिभावंत ट्रान्सवुमन असलेल्या पूजाचा शानदार डान्स व्हिडिओ सध्या ट्रेंड करतोय. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक्स केला आहे. तर शेकडो लोकांनी त्यावर कमेंट्स करून तो व्हायरल केला आहे. नेटिजन्सकडून पूजाच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
View this post on Instagram
सुपर, उत्तम, वाहss
पूजा शर्माच्या व्हिडिओला भरभरून दाद मिळत आहे. ‘बहुत बढ़िया एक्सप्रेशन, सुपर, उत्तम, वाहsss, अशी कमेंट एक यूजरने केली आहे. तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, पहिल्यांदा या गाण्यावर काही तरी चांगलं पाहायला मिळाले आहे. तू खूप खूप सुंदर दिसते आहे, असे देखील एकाने लिहिले आहे.