Top Recommended Stories

Ukraine Russia War: युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्कींचा डान्स व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, तुम्ही सुद्धा एकदा बघाच!

Ukraine Russia War : जेलेंस्कींचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते एका महिलेसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 48 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Updated: February 28, 2022 5:43 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

volodymyr zelenskyy dancing video
volodymyr zelenskyy dancing video

Ukraine Russia War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्कीं (Volodymyr Zelenskyy) यांची सध्या जगभरात चर्चा होत आहे. खरं तर जेलेंस्कींच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता रशियाने युक्रेनवर हल्ला (Ukraine Russia War) केला. मात्र, या कठीण काळातही अतिशय खंबीरपणे धीराने आणि धैर्याने रशियाशी झुंज देणारे जेलेंस्कीं जगभरात लोकप्रिय झाले आहेत. जेलेंस्कींच्या व्यक्तिमत्त्वाने लोक इतके प्रभावित झाले आहेत की सोशल मीडियावर (Social Media) प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहेत. युक्रेनवर रशियाने (Russia) केलेल्या हल्ल्यादरम्यान जेलेंस्कींचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे ज्यामध्ये ते एका महिलेसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 48 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जेलेंस्कीं एक विनोदी कलाकार होते.

Also Read:

You may like to read

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल झालेला वोलोडिमिर जेलेंस्कीं यांचा हा व्हिडिओ 2006चा आहे. जेव्हा त्यांनी एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये (Dance Reality Show) भाग घेतला होता. त्यावेळी ते युक्रेनच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. ‘डान्सिंग विथ द स्टार्स’ (Dancing with the Stars) नावाच्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये वोलोडिमिर जेलेंस्कीं यांनी फक्त सहभाग घेतला नव्हता तर ते या शोचे विजेता देखील झाले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही वोलोडिमिर जेलेंस्कीं त्यांच्या सहकलाकारासोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

वोलोडिमिर जेलेंस्कीं यांनी अगदी लहान वयात अभिनयाच्या जगात पदार्पण केले होते. नंतर त्याचे नाव युक्रेनच्या सर्वात चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक झाले. असे म्हटले जाते की, 2014 मध्ये जेव्हा युक्रेन सरकारने रशियन कलाकारांना देशात काम करण्यास बंदी घातली होती तेव्हा सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये वोलोडिमिर जेलेंस्कीं यांचा समावेश होता. यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले. आता रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर वोलोडिमिर जेलेंस्कींची जगभर चर्चा होत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 5:36 PM IST

Updated Date: February 28, 2022 5:43 PM IST