Top Recommended Stories

Unique House In Colombia: कोलंबियात हे काय सुरु आहे, कोरोनाशी जोडला जात आहे थेट संबंध !

Unique House In Colombia: कोलंबियाची (Colombia) राजधानी बोगोटाजवळ (Bogota) असलेल्या ग्वाटावीटा (Guatavita) येथे अनोखे घर आहे. हे घर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. सध्या सोशल मोडियावर (Social Media) घराचे फोटो व्हायरल होत आहे.

Published: January 26, 2022 3:12 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Unique House In Colombia: कोलंबियात हे काय सुरु आहे, कोरोनाशी जोडला जात आहे थेट संबंध !

Unique House In Colombia: कोलंबियाची (Colombia) राजधानी बोगोटाजवळ (Bogota) असलेल्या ग्वाटावीटा (Guatavita) येथे अनोखे घर आहे. हे घर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. सध्या सोशल मोडियावर (Social Media) घराचे फोटो व्हायरल होत आहे. जो कोणी या घराकडे बघतो तो बघतच राहतो. कारण हे घर बाहेरून आणि आतून बाहेरून उलटे आहे. या घराचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या घराचा संबंध थेट कोरोनाशी जोडला जात आहे. कोरोना व्हायरसने ज्याप्रमाणे जगाला उलट-सुलट करून टाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर या घराकडे पाहिले जात आहे.

Also Read:

जाणून घ्या काय आहे या घराचे वैशिष्ट्ये..

‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, अद्वितीय असे हे घर ऑस्ट्रियाचे (Austria) फ्रित्झ शाल ( Fritz Schall) यांनी डिझाईन केले आहे. ते आपल्या परिवारासोबत कोलंबियातच राहत आहेत. हे घर हटके आहे. टुरिस्ट या घराच्या सिलिंगवर चालतात आणि आपल्या फोटोने दुसऱ्यांना चकीत करतात. या घरात प्रवेश केल्यानंतर असा वाटते की, आपण उलट जगात वावरतो आहे. या घरातील सर्व फर्निचर फरशीवर दिसते तर व्यक्तीला सिलिंगवर चालल्याचा अनुभव येतो.

You may like to read

अशी मिळाली घर बनविण्याची प्रेरणा

घर डिझाइन करणारे फ्रित्झ शाल म्हणाले, हे घर बनवण्याची प्रेरणा 2015 मध्ये मिळाली होती. ते त्यांच्या नातूसह आपला ऑस्ट्रियाला जात होतो. त्यानंतर जेव्हा मी लोकांना सांगितले की मी एक उलटे घर बनवीत आहे. तेव्हा लोक माझ्याकडे असे बघत होते. जणू मी वेडा आहे. त्यांना माझ्या गोष्टींवर विश्वास बसला नाही.

कोरोनामुळे वाढल्या अडचणी

फ्रित्झ शाल म्हणाले, कोरोनामुळे (Corona Pandemic) घराच्या निर्मिती दरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बांधकामास प्रचंड विलंब झाला. जानेवारी 2022 पासून या घराला पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या घराला बघण्यासाठी लांबून पर्यटक येत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 3:12 PM IST