Top Recommended Stories

Viral News: आश्चर्यच! या मुलीला आहे चार हात आणि चार पाय! पाहून डॉक्टरही झाले चकित

Viral News : सोशल मिडियावर सध्या एका चुमुकलीचा व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल (Viral News) होत आहेत. चार हात आणि चार पाय असलेल्या या मुलीला पाहून सर्वांना आश्चर्य (Abnormal child) होत आहे.

Published: May 30, 2022 7:04 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Viral News: आश्चर्यच! या मुलीला आहे चार हात आणि चार पाय! पाहून डॉक्टरही झाले चकित
Viral News

Viral News : सोशल मिडियावर सध्या एका चुमुकलीचा व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल (Viral News) होत आहेत. चार हात आणि चार पाय असलेल्या या मुलीला पाहून सर्वांना आश्चर्य (Abnormal child) होत आहे. या मुलीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Photos) होत आहेत. बिहारच्या नवादा (Nawada of Bihar) जिल्ह्यातील हेमदा येथील रहिवाशी असलेले वसंत कुमार आणि उषा देवी याची ही मुलगी आहे. तिचं नाव चुंबूखी कुमारी (Chumbukhi Kumari) आहे. तिला एक 11 वर्षांचा भाऊ देखील आहे.

विशेष म्हणजे या मुलीच्या कुटूंबियांनी तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले तेव्हा डॉक्टरांना देखील धक्का बसला. परंतु तिच्या वडीलांकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. हे कुटूंब राहत आसलेल्या परिसरातील एक सामाजिक समाजिक कार्यकर्ते असलेले राजेश कुमार याची नजर या मुलीवर गेली. त्यानंतर त्यांनी तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करून उपचारासाठी देणगी देण्याचे आवाहन केले. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

You may like to read

माध्यमांतील रिपोर्टनुसार. चुंबूखी कुमारीचे वडील वसंत कुमार यांनी आपली मुलगी जन्मापासून दिव्यांग असल्याचे सांगितले. तिचा जन्म झाला तेव्हाच तिला चार हात आणि पाय होते. परंतु आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिच्यावर उपचार करू शकलो नाही असे त्यांनी सांगितले. वसंत कुमार हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>