Viral Video: सिडीवरून एवढ्या वेगाने उतरला हा चिमुकला, व्हिडिओ पाहून बसणार नाही विश्वास
Viral Video: सोशल मीडियाच्या जगात असे काही अप्रतिम व्हिडिओ पाहायला मिळतात की डोळ्यांवर विश्वास बसत नाही. काही व्हिडिओ अतिशय मनोरंजक आणि मन जिंकणारे असतात, तर काही चकित करणारे असतात.

Viral Video: सोशल मीडियाच्या जगात असे काही अप्रतिम व्हिडिओ (Awesome video) पाहायला मिळतात की डोळ्यांवर विश्वास बसत नाही. काही व्हिडिओ अतिशय मनोरंजक आणि मन जिंकणारे असतात, तर काही चकित करणारे असतात. आता पुन्हा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ एका लहान मुलाचा (Child Video) आहे. व्हिडिओमध्ये तो ज्या पद्धतीने छतावरून जिन्याच्या साहाय्याने खाली उतरत (Child on stairs) दिसतो ते खूपच आश्चर्यकारक आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक या व्हिडिओवर आक्षेपही घेत आहेत.
Also Read:
मुलगा पायऱ्यांवरून वेगाने खाली उतरतो
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मूल छतावरून खाली उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. तो पायऱ्यांवर चढतो आणि स्वतः घसरत खाली उतरतो आणि त्याने काही न केल्यासारखं तिथून निघून जातो. व्हिडिओमध्ये दिसणारे हे मूल खूपच लहान आहे आणि या वयात मुलांना नीट चालता येत नाही. परंतु हा मुलगा आतापासून आश्चर्यकारक पराक्रम करताना दिसतोय.
येथे पाहा व्हिडिओ…
View this post on Instagram
व्हिडिओवर नेटिझन्सकडून भरभरून प्रतिक्रिया
या व्हिडीओमध्ये एक लहान मूल आश्चर्यकारकपणे पायऱ्या उतरताना दिसतंय. मात्र यादरम्यान कोणतीही घटना घडू शकली असती. या गोष्टीमुळे अनेकांनी या व्हिडिओ पोस्टवर कमेंट करून चिंता व्यक्त केली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘याला ऑलिम्पिकसाठी तयार करा’ असे लिहिले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या