मुंबई: लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत (wedding video) मुलीचे वडील तिला निरोप देताना तिच्या सुरक्षेसाठी आणि सुखासाठी किती काळजी करतात हे पाहण्यासारखे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी तो लाईक केला आहे.Also Read - Birds Funny Video : पक्षांना कधी सेल्फी घेताना, लॅपटॉपवर काम करताना पाहिलंय? मग हा व्हिडिओ पाहा

सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विवाह सोहळा संपल्यानंतर मुलगी तिच्या वडिलांच्या शेजारी बसली आहे. नवरदेव समोर उभा आहे. यावेळी वधूचे वडील आपल्या जावयाला जे सांगत आहेत ते पाहून आणि ऐकूण तुमच्या चेहऱ्यावर देखील हसू येईल. Also Read - Viral Video: टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजच्या स्पोर्ट्स बाईकला भीषण अपघात, सीसीटीव्ही फूटेज होतेय व्हायरल!

वडील आपल्या मुलीला सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी जावायाला मजेशीर दम भरत (wedding funny video) आहेत. ते म्हणतात “माझ्या हातात असलेली काठी माझ्या मुलीच्या सुरक्षेसाठी आहे. तुम्ही (जावई) स्वत: तिचे रक्षण करा, जर कधी तिला कधी असुरक्षित वाटले तर माझी काठी लक्षात ठेवा. तुम्ही सैनिक असलात तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही.” Also Read - Viral Video: अचानक बसमध्ये 'टिप टिप बरसा पाणी', प्रवाशांची उडाली धांदल!

या दरम्यान ते आपल्या जावयासोबत विनोद करतानाही दिसतात. खरंतर जावई समोर उभा असल्याचे पाहून मुलीचे वडील गमतीने म्हणतात-जावाई देवता मुलीने तुम्हाला कधी पाय दाबायला सांगितले तर निसंकोचपणे दाबा. पायच दाबा गळा नाही दाबायचा. नाहीतर पाय दाबता दाबता गळा दाबायला लागाल. असे करायचे नाही”

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर witty_wedding यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर नेटिजन्सनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी तो लाईक केला आहे.