By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Viral Video: आईचं प्रेम! रस्त्यावर भीक मागून मुलासाठी खरेदी केली स्कुटी, व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video: एका आईने आपल्या मुलाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी रस्त्यावर भीक मागून त्याला स्कुटी घेऊन दिली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरंय. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील ही आई असून सोशल मीडियावर या बाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Viral Video: प्रत्येक आईचे (Mother) आपल्या मुलांवर प्रेम (Love) असते. मुलांच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी आई नेहमीच संघर्ष (Struggle) करत असते. वेळप्रसंगी आपला जीव देण्यासाठी देखील ती मागेपुढे पाहत नाही. अशाच एका आईने आपल्या मुलाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी रस्त्यावर भीक मागून (begging on the street) त्याला स्कुटी घेऊन दिली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरंय. पश्चिम बंगालमधील (West Bengal) नादिया जिल्ह्यातील ही आई असून सोशल मीडियावर या बाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भीक मागून केलं मुलाचं स्वप्न पूर्ण –
गेल्या काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये एकाने भीक मागून स्वप्नातील बाईक खरेदी केल्याची बातमी समोर आली होती. अशीच घटना पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात घडली आहे. या ठिकाणी एका आईने भीक मागून आपल्या मुलाचे स्कुटी खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे. स्कुटी खरेदीसाठी शोरुमध्ये चिल्लर भरलेल्या बादल्या नेत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बाला पांडे असे या आईचे नाव असून मुलाचे नाव राकेश आहे. राकेश हा मिळेल ते काम करतो तर त्याची आई भीक मागून दोन वेळच्या जेवणाची सोय करते.
राकेशला स्कुटीचे खूप आकर्षण असून त्याने स्कुटी घेण्याचे स्वप्न आईजवळ बोलून दाखविले होते. त्यानुसार मुलाचे स्वप्न पूर्ण करायची जिद्द मनाशी बाळगत बाला पांडे यांनी भीक मागून एक एक रुपया जमा केला. जमा झालेली रक्कम तिने राकेशला दिली.
स्कूटी खरीदने के लिए 80 हजार रुपये के सिक्के शोरूम में ले पहुंचा शख्स, देखिए ये वीडियो pic.twitter.com/y5qDLqzGu0
— India.com (हिन्दी) (@IndiacomNews) March 30, 2022
चिल्लर घेऊन गाठले शोरूम –
बाला पांडे यांनी जमा केलेली चिल्लर तीन प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये भरून राकेशने मित्रांसोबत शोरूम गाठले. जवळपास 80 हजार रुपयांची हे चिल्लर होते. मुलाने एवढी मोठी चिल्लर आणल्याने शोरूममधील कर्मचारी चक्रावून गेले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी चिल्लर मोजून राकेशच्या हातात स्कुटीची चावी दिली. यावर शोरूम मॅनेजरने सांगितले की, या आधी 10 ते 12 हजार रुपयांपर्यंतचे चिल्लर घेतली आहे. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात चिल्लर आली. आम्ही हे नाणे स्वीकारत स्कुटी विकल्याचे त्यांनी सांगितले. तर राकेशने सांगितले की, ‘मी मजुरी करतो. आई भीक मागून उदर्निवाह करते. आईने भीक मागून जमा केलेल्या पैशातून मी ही स्कुटी खरेदी केले आहे. आई वृद्ध असल्याने स्कुटीवर बसल्यावर तिलाही स्कुटीमुळे आराम मिळेल.’
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या