मुंबई: सापांच्या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ हा नाग आणि नागिनीचा असून दोघेही प्रेमक्रीडेत (Naag Nagin Prem) बुडून गेल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जवळपास अडीच मिनिटांचा हा व्हिडिओ असून यातील दोन्ही साप एका घराच्या छतावर खेळताना दिसत आहेत. दोन्ही साप एकमेकांना अलिंगन (Snakes Making Love) देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडिओत दिसत आहे. छतावर खेळत असलेल्या या सापांचा अर्ध्याहून अधिक भाग काही क्षणानंतर छतावरून खाली लटकू लागल्याचे देखील या व्हिडिओत दिसते.Also Read - Viral Video: तुम्ही सुद्धा नाश्त्याला टोस्ट खाताय?, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खाणं बंद कराल!

नर आणि मादी दोन्ही साप (Sap Video) बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात. या दरम्यान साप कधी छताच्या वर जातात आणि कधीकधी छतावरून खाली लटकतात. तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. प्रेमक्रीडेत (Naag Nagin Prem Krida) रमलेले दोन्ही साप काही वेळानंतर अचानक जमिनीवर पडले. साप जमिनीवर पडताच आजूबाजूचे लोक गोंधळून गेले तर काहींनी भीतीने अरडाओरड केल्याचे ही व्हिडिओत ऐकू येते. मात्र, हे साप खाली पडल्यानंतर पुन्हा एकदा क्रीडा (Snakes Love) करताना व्हिडिओत दिसत आहे. Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

https://twitter.com/rupin1992/status/1426405258708754436 Also Read - Ruchira Jadhav in Saree : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील 'माया'चा जलवा; साडीतील फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

व्हायरल व्हिडिओ आयपीएस रुपिन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी ‘नाग आणि नागिनचे प्रेम’ असे कॅप्शन दिले आहे. आयपीएस रुपिन शर्मा यांनी याआधीही त्याच्या ट्विटर हँडलवर अनेक मजेशीर व्हिडिओ शेअर केले आहेत. (snakes making Love on the roof of house; video went viral on social media)