Viral Video: चोरट्यांनी एटीएमवर चढवले चक्क बुलडोझर, सांगलीतील चोरीचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video: सांगलीमध्ये चोरांनी एटीएम मशीन चोरण्यासाठी चक्क बुलडोझरचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चोरी झालेले हे एटीएम मशीन अॅक्सिस बँकेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Thieves Used Bulldozer To Break ATM Machine : चोरटे अनेकदा चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरतात. अशीच एक चोरी सांगलीमध्ये झाली आहे. सांगलीच्या मिरजमध्ये चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्यासाठी चक्क बुलडोझरचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘हिंदुस्तान’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. चोरी झालेले हे एटीएम मशीन अॅक्सिस बँकेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
Also Read:
हिंदूस्तानने दिलेल्या वृ्त्तानुसार, मिरज झालेल्या या चोरीआधी चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी एक जेसीबी चोरले आणि त्याच जेसीबीने एटीएम मशीन खोदले आणि पळवून नेले. रविवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. बूथमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या एटीएम मशिनमध्ये 27,00,000 रुपये होते असा दावा करण्यात आला आहे. चोरी झाली त्यावेळी एटीएम मशीनच्या बाहेर सीसीटीव्ही आणि गार्ड नव्हता. एटीएम मशीन फोडल्यानंतर चोरट्यांनी ते काही अंतरावर पळवून नेले होते.
https://twitter.com/DextrousNinja/status/1518061508567068673
चोरट्यांनी बुलडोझरचा वापर करून बुथमधील एटीएम मशीन फोडल्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्संनी या चोरांच्या धाडसावर कमेंट केल्या आहेत. तर काही जण वाढलेल्या बेरोजगारीला दोष देत आहेत. फेसबुकवर एका युजरने ‘इंडिया गॉट टॅलेन्ट” अशी कमेन्ट केली, तर दुसर्या यूजरने लिहिले की, क्रिप्टो मायनिंगच्या काळात एटीएम मायनिंगचा एक नवीन शोध लागला आहे. तर एका यूजरने “मनी हाइस्ट 2023?” अशी कमेन्ट केली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या