Top Recommended Stories

Viral Video: अनोखं लग्न! पुश-अप्स करत वधु-वरांनी केलं लग्न, व्हिडिओची होतेय चर्चा!

Viral Video: सध्या लग्नाचा सीझन आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील (Marriage Video) अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका वर आणि वधूचा जबरदस्त व्हिडिओ (Bridal And Groom Video) व्हायरल होत आहे.

Published: April 25, 2022 1:17 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Viral Wedding Video
Viral Wedding Video

Viral Video : सोशल मीडिया (Social Media) हे असे प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी प्रत्येक गोष्टींची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. याठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि फोटो पोस्ट (Viral Video And Photo) केले जातात. या फोटोंची आणि व्हिडिओंची जोरदार चर्चा होते. सध्या लग्नाचा सीझन आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील (Marriage Video) अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका वर आणि वधूचा जबरदस्त व्हिडिओ (Bridal And Groom Video) व्हायरल होत आहे. अतिशय अनोख्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला आहे. या वधू-वराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Also Read:

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या स्टेजवर पुश -अप्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वधूने सुंदर असा लेहंगा घातला आहे तर वराने शेरवानी घातली आहे. इतक्या सुंदर ड्रेसिंगमध्ये सुद्धा दोघेही पुश-अप्स करत आहे. त्यांची ही लग्नातील अनोखी थीम पाहून लग्नाला आलेल्या पाहुण्यांना आश्चर्य वाटले. वधू-वराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

You may like to read

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण पुश-अप्स करताना वधू आणि वर दोघेही एकमेकांना टक्कर देत आहेत. दोघेही एकमेकांना चॅलेंज देताना दिसत आहेत. वधू-वरांचे हे पुश-अप्स चॅलेंज नेटिझन्सला खूप आवडले असून ते या व्हिडिओला लाइक्स करत आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहेत.

bridal_lehenga_designn नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून वधू आणि वर दोघेही फिटनेस लव्हर असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे फिटनेस प्रेम नेटिझन्सला देखील खूप आवडले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून सर्वांना आवडत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 25, 2022 1:17 PM IST