मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोची (Viral Video and Photos) चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. यामधील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून विचार करायला भाग पाडले जाते. तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून पोट धरुन हसायला आल्याशिवाय राहत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. विमानाने प्रवास करण्यासाठी निघालेली महिला चक्क बिकिनीवर एअरपोर्टवर (Airport) आली. तिला पाहून एअरपोर्टवर असलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.Also Read - Viral Video: तुम्ही सुद्धा नाश्त्याला टोस्ट खाताय?, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खाणं बंद कराल!

Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

व्हायरल होणारा महिलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला विमानाने प्रवास करण्यासाठी चक्क बिकिनी घालून एअरपोर्टवर चालताना दिसत आहे. या महिलेचा बिकिनी लूक (Bikini Look) पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ही महिला बिकिनीवर आली खरं पण कोरोनाचे (Corona Virus) नियम ती विसरली नाही. तिने बिकिनी घातली पण तोंडाला मास्क (Mask) लावायला काही विसरली नाही. या महिलेच्या या एअरपोर्ट लूकवर नेटिझन्सनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. Also Read - Ruchira Jadhav in Saree : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील 'माया'चा जलवा; साडीतील फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

Humans Of Spirit Airlines या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये (Caption) ‘किमान तिने मास्क घातले आहे’ असे लिहिले आहे. या व्हिडिओला 75 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटिझन्सनी मजेशीर कमेंट्स सुद्धा केल्या आहेत. तसंच त्यांनी आपल्या अकाऊंटवर (Social Media Account) हा व्हिडि शेअर देखील केला आहे.