असं म्हणतात, की प्रेम आंधळं असतं. (Love) प्रेमाला वय, जातपातीचं बंधन नसतं. प्रेम कोणासोबतही होऊ शकतं. लग्नाची रेशीमगाठ ही स्वर्गात बांधली जात असते. (Weird marriage news) अशाच एका अनोख्या लग्नाची कहाणी बिहारमध्ये (Bihar News) समोर आली आहे.Also Read - Bihar Rain: बिहारला अवकाळी पावसाने झोडपले, वीज पडून 33 जणांचा मृत्यू

एका तरुणाचं चक्क तृतीयपंथीवर (Third Gender) प्रेम जडलं. एवढंच नाही तर दोघांनी लग्न देखील केलं. ही विचित्र घटना सासाराम जिल्ह्यात घडली आहे. लग्नानंतर नवं दाम्पत्य घरी पोहोचलं. मुलगा आणि नवी सून घरी आल्याचं पाहून आईला आनंद झाला. नव्या सूनेचं स्वागत करण्यासाठी ती दरवाज्यात आली. परंतु नव्या सूनेचा चेहरा पाहाताच आईला मोठा धक्का बसला. तिची शुद्ध हरपली. शुद्ध परतल्यानंतर तिचा पारा आणखीच वाढला. मुलाच्या लग्नाला तिनं कडाडून विरोध केला. आपली सून तृतीयपंथी आहे, हे तिला मान्य नसल्याचं सांगत तिनं रागाच्या भरात मुलगा आणि सूनेला बाहेरचा रस्ता दाखवला. Also Read - BIG BREAKING: बिहारमध्ये प्रवासी बोट पलटी होऊन 22 जण बुडाले, 6 जणांचे मृतदेह बाहेर काढले

बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील करगहर येथे झालेलं हे अनोखं लग्न आता परिसरातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तरुणाचे नातेवाईकांना हे लग्न मान्य नाही, तर तरुण आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. Also Read - Miracle 82 Teeth: बिहारमधील विचित्र घटना, नितीश कुमारच्या जबड्यातून काढले 82 दात!

करगहर येथील रहिवासी गोलू हा आधी एका नाच पार्टीत काम करत होता. त्याचदरम्यान, त्याचं आणि नंदिनीचं प्रेम जुळलं. नंतर दोघांनी लग्न केलं, आता मात्र, गोलूच्या नातेवाईकांनी या लग्नाला कडाडून विरोध केला आहे.

तरुणानं किन्नरच्या गळ्यात बांधलं मंगळसूत्र

अशी एक घटना गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील मनमाड शहरात घडली होती. समाज आणि लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जावून एका तरुणानं तृतीयपंथीयाच्या गळ्यात मित्र आणि घरातील मंडळीच्या साक्षीनं मंगळसूत्र बांधलं. हा आगळावेगळा विवाह सोहळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मनमाड शहरातील तृतीयपंथी शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली. नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं, हे दोघांनाही समजलं नाही. शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. समाज काय म्हणेल, याच्या पलिकडे जावून शिवलक्ष्मी आणि संजयनं आपापल्यापरीनं प्रयत्न करून घरच्या मंडळीचा होकार मिळवला. दोघांचा विवाह नुकताच नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात पार पडला.