तिरुअनंतपुरम : केरळच्या वन अधिकाऱ्यांनी व्हेल ची उलटी (Whale Ambergris) विकणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. हे लक्षात घ्या की व्हेलच्या उल्टीची (Whale Mashachi Ulti) किंमत कोटींमध्ये असते. लक्षद्वीपच्या पर्यावरण विभाग आणि वन विभागाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले की “अटक केलेले लोक अँड्रोट आणि अमिनी बेटांचे रहिवासी आहेत. केरळच्या वन अधिकाऱ्यांनी 1.4 किलो व्हेलच्या उलटीसह आरोपींना अटक केली आहे. त्याची किंमत जवळपास 1.4 कोटी आहे. व्हेलच्या उलटीला अंबरग्रिस (Ambergris) असेही म्हणतात. (Whale Ambergris: Whale vomit is valuable; You will be amazed at the total price of one kg of ambergris!)

काय आहे व्हेल एम्बरग्रिस? (What is Whale Ambergris)

व्हेल माशांच्या उलटीला अंबरग्रीस असे म्हणतात. तज्ञांचे मते ति विष्ठा असते. म्हणजेच व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा मल पदार्थ. खरंतर त्याचा उगम व्हेलच्या आतड्यातून होतो. व्हेल मासा समुद्रात अनेक गोष्टी खातो. यामुळे त्या गोष्टी तो पचवू शकत नाही तेव्हा तो त्या बाहेर ओकतो. लक्षात घ्या की अंबरग्रिस राखाडी किंवा काळ्या रंगाचा एक प्रकारे मेणापासून बनलेला दगडासारखा पदार्थ असतो.

व्हेल एम्बग्रिस का असते महाग? (Why are whale embryos expensive)

एम्बग्रिस व्हेल माशांच्या पचन प्रक्रियेदरम्यान तयार होते आणि आतड्यातून बाहेर पडते. त्याला अतिशय दुर्गंधी असते. परंतु सुगंधी परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या त्याचा वापर करतात. खरं तर त्याचा उपयोग आपल्या शरीरावर परफ्युम टिकवून ठेवण्यासाठी होतो. यामुळे परफ्युम बराच काळ टिकतो. यामुळेच परफ्यूम कंपन्या महागड्या किंमतीत त्याची खरेदी करतात. याचा वापर औषध म्हणून देखील केला जातो. तसेच सेक्सशी संबंधित समस्यांच्या उपचारांमध्येही अंबरग्रिसचा वापर केला जातो. यामुळे बाजारात त्याची किंमत कोटींमध्ये आहे. (Whale Ambergris: Whale vomit is valuable; You will be amazed at the total price of one kg of ambergris!)