मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची (Viral Video) चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. यातील काही व्हिडिओ खूपच गमतीशीर असतात. हे व्हिडिओ पाहून आपण पोट धरुन हसल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून खूप व्हायरल होत आहे. स्विमिंग पूलमध्ये (Seimming Pool) एक महिला उडी मारते पण त्यानंतर जे काही झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.Also Read - Viral Video : लग्नात सासऱ्याने केली जावायासोबत गंमत; म्हणाले मुलीने कधी पाय दाबायला सांगितले तर बिनधास्त दाबा! पाहा व्हिडिओ

Also Read - Viral Video: अचानक बसमध्ये 'टिप टिप बरसा पाणी', प्रवाशांची उडाली धांदल!

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला स्विमिंग पूलमध्ये (Swimming pool video) स्विमिंग करण्यासाठी उडी घेताना दिसत आहे. ही महिला ड्राइव्हिंग बोर्डवर (Driving Board) उभी राहते आणि उडी मारण्यासाठी तयार होते. या महिलेचा व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती तिला उडी मारायला सांगते. होतं असं की ती स्विमिंग पूलमध्ये उडी घेते खरं पण तिने डोक्यावर लावलेला विग निघतो. महिला स्विमिंग पूलमध्ये पडते तर तिचा विग ड्राईव्हिंग बोर्डवर पडतो. Also Read - RJ Malishka Dance Video: नीरज चोप्राची मुलाखत घेताना मलिष्किने केला डान्स, नेटकरी करत आहेत ट्रोल!

यावेळी स्विमिंग पूलमध्ये असणारी इतर लोकं महिलेला पाहून जोरजोरात हसू लागतात. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ Hold My Beer या ट्विटर अकाऊंवरुन (Twitter Account) पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘तिला आपले केस ओलं करण्याची इच्छा नाही.’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओ काही सेंकदाच सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओला 366.2k व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटिझन्सनी देखील मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.