कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याला सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने (Heavy rainfall) झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीला पूर (Flood in kolhapur) आल्यामुळे पूराचे पाणी कोल्हापूर शहरामध्ये शिरले आहे. त्याचसोबत जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पूराचे पाणी देखील गावामध्ये शिरल्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम, आर्मीचे जवान आणि स्थानिक प्रशासनामार्फत शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या पूराचे बरेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होत आहे. त्यामधील पूरामध्ये अडकलेल्या  लोकांना वाचवणाऱ्या एनडीआरएफच्या टीमच्या (NDRF Team) एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.Also Read - Viral Video: तुम्ही म्हशीला डान्स करताना कधी पाहिलंय का?, हा व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकीत!

Also Read - Mount Manaslu Avalanche: नेपाळच्या माऊंट मनास्लूमध्ये भीषण हिमस्खलन, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा व्हिडिओ 24 जुलै रोजीचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकली गावाला पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे. पूरामध्ये अडकलेल्या या गावातील नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम धावून आली आहे. आपला जीव वाचवण्यासाठी या गावातील नागरिक घराच्या छतावर चढले होते. या नागरिकांना वाचवताना एका महिलेला घराच्या छतावरुन खाली उतरण्यास भीती वाटत होती. तर या महिलेला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या जवानाने सीडी नसल्यामुळे स्वत:च्या पाठीवर महिलेला पाय ठेवायला सांगून बोटीमध्ये उतरवले आणि तिचे प्राण वाचवले. Also Read - Chandni Chowk Bridge Demolished Video : 600 किलो स्फोटके वापरून पाडला चांदणी चौकचा पूल, पाहा व्हिडिओ!

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on social media) होत असून एनडीआरएफच्या जवानाचे कौतुक होत आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्ये पूरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडेच पाणीच पाणी झाले आहे. पूराचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. तसंच पूराचे पाणी मुंबई-बंगळुरु महामार्ग (mumbai-bangalore highway) आहे. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्ग वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.