लखनऊ : रस्त्यावरुन चालताना मोबाईलवर बोलणं (crossing road while talking phone) एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मोबाईलवर बोलत चालल्याने एका कारने या तरुणाला जोरदार धडक (Car accident) दिली. या अपघातामध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (young man death) झाला. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social media) होत आहे. हा व्हिडिओ (Viral video) पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.Also Read - Terror Module: मुंबईच्या जोगेश्वरीमधून सातवा संशयित दशतवादी ताब्यात, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

Also Read - Rajasthan Rape Case: मन सुन्न करणारी घटना! 19 वर्षांच्या तरुणाने आजीची हत्या करुन मृतदेहावर केला बलात्कार!

ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊ (Lucknow) शहरातील आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत चालताना दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध आल्यानंतर एक कार वेगामध्ये येते. अचानक कार समोर आल्यामुळे तरुणाला कोणत्या बाजूला जाऊ हे कळत नाही. याच्या नादात भरधाव कार त्याला जोरदार धडक देते. या अपघातात तरुण आठ फूट उंच हवेत उडून खाली पडतो. या अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. Also Read - Ulhasnagar Rape Case: धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर मामाने केला बलात्कार!

‘या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अनिल उपाध्याय (Anil Upadhyay) आहे. तो जौनपूरचा राहणारा होता. विजयनगरमधील एका खासगी कंपनीमध्ये तो कामाला होता. 17 जुलैला सकाळी तो लखनऊच्या बाराबिरवा चौकातून रस्ता ओलांडत होता. त्यावेळी तो फोनवर बोलत होता. अशामध्येच भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला.’, अशी माहिती पोलिस निरीक्षक आलोक कुमार राय यांनी दिली आहे.

गंभीर जखमी झालेल्या अनिलला ताबडतोब रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी (Doctor) त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी अनिलच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल (FIR Register) केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्सनी रस्त्यावरुन चालताना मोबाईलवर बोलू नये अशा कमेंट्स केल्या आहेत.